चाळीसगाव प्रतिनिधी । ठिबकच्या नळ्या जमा करण्यासाठी शेतात गेलेल्या एका महिलेवर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली आहे.
यबाबात सविस्तर वृत्त असे की, हिम्मत त्र्यंबक मोरे (वय-४८ रा. तळेगाव) हे पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. मोरे हे शेती व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत. रविवार दिनांक २ मे रोजी दुपारी ठिबकच्या नळ्या जमा करण्यासाठी त्यांची पत्नी वंदना हिम्मत मोरे (वय-४५) व मुलगा (वय-२१) शेतात गेले असता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक वादळीवार्यासह पावसाचे जोरदार आगमन झाले.
याच वेळेस अचानक वीज कडाडून वंदना हिम्मत मोरे यांच्यावर कोसळली आणि त्यातच त्याचे दुदैवी मृत्यू झाले. सोबत असलेल्या मुलास सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. ही थरारक घटना ऐकून अनेकांचे अंगावर शहारे आले. हिम्मत मोरे यांच्या कुटुंबावर यामुळे आपत्ती कोसळली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम १७४ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शांतीलाल पगारे हे करीत आहेत.