चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील रस्त्यांना दर्जोन्नत करण्यात आले आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारच्या माध्यमातून ३१ इजिमा व ग्रामा यांच्या एकूण ११८.९ किमी रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील आज जाहीर झाला आहे. या रस्त्यांना राज्य शासनाच्या स्टेट बजेट मधील निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून चाळीसगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग हे जिल्हा परिषदेकडे वर्ग असल्याने त्यांना राज्य शासनाचा निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत होत्या. आता या अडचणी पूर्णपणे दूर होणार आहेत.
प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत झालेल्या रस्त्यांची नावे –
१) – प्रजिमा ४० ते वलठाण फाटा -३२ नं. तांडा – शामवाडी- चितेगांव – निमखेडी – हिरापुर – अंधारी – तमगव्हाण रस्ता. (१३ किमी) नवीन प्रजिमा १४२
२) – अंधारी – शेवरी – ब्राह्यणशेवगे – देवळी – भोरस – करगांव – तरवाडे – रहीपुरी रस्ता. (२२.५ किमी) नवीन प्रजिमा १४३
३) – राज्यमार्ग-२११ ते मेहुणबारे – शिदवाडी – दस्केबडी – जामदा – रहीपुरी – बोरखेडा बु. – ढोमणे फाटा – वडाळा – हिंगोणे सिम राष्ट्रीय महामार्ग ७५३ ला मिळणारा रस्ता. (११.५ किमी) नवीन प्रजिमा १४४
४) – राज्यमार्ग-२४ ते जामडी – चांभार्डी बु. – मुंदखेडा – पांतोडा – वाघळी स्टे – न्हावे – बोरखेडा – बहाळ खेडगांव – गुढे ते जिल्हा हद्द रस्ता, (१६.२ किमी) नवीन प्रजिमा १४५
५) – रामा-१९ – रामनगर – लोंढे – कृष्णापुरी – वरखेडे खु. – पिंपळवाड म्हा. – टाकळी प्र.दे. – देशमुखवाडी – अलवाडी – सायगांव – नांद्रे – काकडणे – माळशेवगा – शेवरी – हिरापुर रस्ता. (२६ किमी) नवीन प्रजिमा १४६
६) – मेहुणबारे – शिदवाडी – पोहरे – अभोणे – कळमडू – जिल्हा हद्द रस्ता. (१०.२ किमी) नवीन प्रजिमा १४७
७) – चाळीसगांव – कोदगांव – बेलदारवाडी – गणपुर तांडा – पिंपरखेड गांव – सांगवी रस्ता. (१९.५ किमी) नवीन प्रजिमा १४८
दरम्यान, लवकरच या रस्त्यांना विविध रस्ते विकास योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल असेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले.