चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खरजाई येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दुचाकीसह ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पाच जणांवर कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र कलम-१४४ प्रमाणे संचारबंदी पुकारण्यात आलेली असताना तालुक्यातील खरजाई येथील गावठाण जागेत पत्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळताच. शहर पोलिसांनी सदर ठिकाणी काल रात्री १:२० वाजताच्या सुमारास छापा टाकला.
या छाप्यामध्ये दुचाकीसह ७८,८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी पाच जणांवर कारवाई करण्यात आली. यात रमेश हिम्मत पानकर (५६), बापू हिरामण पिलारे (३५), निंबा धनराज निकुंभ (३३), विजय दगडू मुलमुले (३३) व संदीप सजन मडके (जांभळे वय- २६) सर्व रा. खरजाई ता. चाळीसगाव यांचा समावेश आहे.
या संदर्भात पोकॉ/९९४ विनोद तुकाराम खैरनार यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम- १८८, २७९, २७०, ३७(१)(सी), १३५ अशा विविध कलमान्वये रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ/२०५८ गणेश पाटील हे करीत आहेत.