Home Cities चाळीसगाव ब्रेकींग : दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान हुतात्मा

ब्रेकींग : दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान हुतात्मा

0
37


चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव येथील यश डिगंबर देशमुख हा जवान श्रीनगर जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला असून यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.

या हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून संध्याकाळपर्यंत या विषयी अधिक माहिती मिळेल. या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहे.

दरम्यान, दोन हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील यश डिगंबर देशमुख या जवानाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यश हा गेल्या वर्षी लष्करात भरती झाला होता. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो शहीद झाल्याचा फोन त्याच्या वडिलांना आला. त्याच्या वीर मरणाने परिसरावर शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound