चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातल्या रस्त्यावरील खड्डे न बुजल्यास आम आदमी पार्टीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आम आदमी पार्टीने स्टेशन रोडवरील बडोदा बँकेसमोरील खड्ड्याच्या संदर्भात मुख्याधिकारी गोरे यांना निवेदन दिले आहे. यात खड्डे बुजण्याचे काम २५ नोव्हेंबरपर्यंत काम करावे व समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली होती. समस्या न सोडवल्यास २६ नोव्हेंबर रोजी संविधानदिनी बडोदा बँकेसमोर आम आदमी पार्टीच्यावतीने रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा दिलेला आहे. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.