चाळीसगाव विधानसभेसाठी सेनेने उमेदवारी करावी; शिवसैनिकांची मागणी

shivsena

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुका शिवसेनेची घाटरोड येथील शिवसेनेच्या कार्यालयात दुपारी बैठक घेण्यात आली. यावेळी चाळीसगाव तालुक्यात शिवसेनेचे उमेदवारी करावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांकडे केली. शिवसेनेच्या जिवावर भाजपाचा उमेदवार निवडून येत असून निवडून आल्यानंतर हा लोकप्रतिनिधी शिवसैनिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेत नाही. आमचे कामही करत नाही, असा नाराजीचा सूर शिवसैनिकांनी यावेळी काढला.

या बैठकीस शिवसेनेचे जेष्ठ नेते तुकाराम कोळी, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाने, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, तुकाराम पाटील, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, मदनदास बैरागी, महिला आघाडीच्या प्रतिभा पवार, अनिता शिंदे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महेंद्र पाटील, तुकाराम कोळी, दिलीप घोरपडे, तुकाराम पाटील, सचिन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवसैनिकांच्या आग्रहाखातर शिवसेना उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरेल असे या बैठकीत सांगण्यात आले.

Protected Content