चाळीसगाव (मुराद पटेल) । दुष्काळग्रस्त भागात गरजूंना एक महिन्याचा किराणा देण्यात आला. तर निराधार मुले व महिलांना चप्पलचे वाटप तर लहान मुलांना आईस्क्रीम आणि चॉकलेट देण्यात आले, हा स्तुत्य उपक्रम मुंबई डोंबिवली ग्रुप आणि चाळीसगाव जैन गृपच्या वतीने करण्यात आला. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
26 मे रोजी हा कार्यक्रम करण्यात आला. तालुक्यातील ग्रामीण भागातील अंधारी, न्हवे, दसेगाव, गणेशपुर, पटखडकी या गावांमध्ये जावून किराणा किटचे वाटप करण्यात आले. दुष्काळग्रस्तांना एक महिना किराणा पुरेल एवढा सामान सोबत ताट, वाटी, ग्लास व जेवणाचा डबा सोबत देण्यात आला. चाळीसगाव शहरातील काही गरजूंना सुध्दा घाट रोड उपासना येथे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तीनशे दुष्काळग्रस्त शेतकरी व गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट देण्यात आले. यात कुशल सोलंकी, हितेश सोलंकी, संदेश टाटिया, राजेश जैन यांच्यासह नवयुवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील वर्षी सुद्धा अशाच प्रकारे 301 कीटचे वाटप करण्यात आले होते.