Home Cities चाळीसगाव स्टींग प्रकरणी पवार व ठाकरेंना भेटणार : आ. मंगेश चव्हाण

स्टींग प्रकरणी पवार व ठाकरेंना भेटणार : आ. मंगेश चव्हाण

0
33

चाळीसगाव प्रतिनिधी | कन्नड घाटातील अवैध वसुलीचे स्टींग ऑपरेशन केल्यानंतर यासाठी कारणीभूत असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

कन्नड घाटातील अवैध वसुलीचा प्रकार आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झाला होता. याप्रकरणी चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीन करण्यात आले आहे. मात्र, अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी लाऊन धरली आहे.

या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, दोषी अधिकार्‍यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. यासंदर्भात राज्याच्या पोलिस महासंचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची भेट झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound