चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव ते धुळे रेल्वे मार्गाचे बहुप्रतिक्षित विद्युतीकरण पूर्ण झाले असून आज या मार्गावरून रेल्वे इंजिनाची चाचणी घेण्यात आली.
बहुप्रतिक्षित चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईन विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आज चाचणी पद्धतीने चाळीसगाव कडून धुळ्याकडे रेल्वे इंजिन रवाना झाले असून यामुळे चाळीसगाव-धुळे रेल्वे प्रवास आता अधिक सुखकर वेगाचा होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चाळीसगावहून धुळे येथे जाणारी रेल्वे लाईन ही ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असून आधी यावरून कोळशाची इंजिने धावत होती. तर अलीकडच्या काही वर्षांमध्ये डिझेल इंजिन वापरात होते. मात्र गेल्या वर्षभरात या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन आज या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आज धुळे पर्यंत रेल्वे इंजिन पोहोचले असल्याने आता येणार्या काळात या मार्गावरील गाडीच्या फेर्या देखील वाढू शकतील किंवा धुळे येथून थेट मुंबई नाशिक पर्यंत गाड्यांची सोय होण्याची शक्यता आहे.
पहा : चाळीसगावहून धुळ्याकडे जाणार्या विद्युत इंजिनाच्या चाचणीचा व्हिडीओ.