पत्रकार प्रिमीयर लीगमध्ये चाळीसगावचा डंका : पटकावले पहिले विजेतेपद !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवतीर्थ मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या पहिल्या पत्रकार प्रिमीयर लीगमध्ये चाळीसगावच्या संघाने अंतीम सामना जिंकून विजेतेपद पटकावले.

जळगावात यंदा पहिल्यांदाच किशोर पाटील, सचिन गोसावी, वाल्मीक जोशी, चेतन वाणी, वसीम खान आणि जकी अहमद या पत्रकारांनी पुढाकार घेऊन पत्रकार प्रिमीयर लीगचे आयोजन केले. या स्पर्धेला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही विभागांच्या पत्रकारांनी यात सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली.

दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री प्रिंट मीडिया विरूध्द चाळीसगाव असा अंतीम सामना रंगला. यात चाळीसगावच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत आठ षटकांमध्ये तीन बाद 79 इतक्या धावा केल्या. तर यानंतर फलंदाजीला उतरलेल्या प्रिंट मीडियाच्या संघाला पहिल्यापासून लय सापडलीच नाही. चाळीसगावच्या गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे विरोधी संघ आठ षटकात चार बाद 51 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यामुळे चाळीसगावच्या संघाने प्रिंट मीडियाला 32 धावांनी पराभूत केले. सामना संपताच चाळीसगावच्या संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

यानंतर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार मुफ्ती हारून नदवी, आयोजक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता व उपविजेत्या संघासह लक्षणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानीत करण्यात आले.

Protected Content