Home Cities चाळीसगाव चाळीसगावात तलवार मिरवणुकीला उसळला जनसागर

चाळीसगावात तलवार मिरवणुकीला उसळला जनसागर

0
351

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणार्‍या हजरत पीर मुसा कादरी बाबा यांच्या तलवार मिरवणुकीला आज जनसागर उसळल्याचे दिसून आले.

कोरोनानंतर पहिल्यांदाच अगदी पहिल्या प्रमाणेच अतिशय उत्साहात शहरातून बामोशी बाबा यांची तलवार मिरवणूक काढण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून हजरत पीर मुसा कादरी बाबा यांचा उर्स सुरू असून आज तिसर्‍या दिवशी पूज्य तलवारीची मिरवणूक काढण्यात आली. उर्स निमित्त दर्ग्यावर मोठी रोषणाई करण्यात आलेली आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू कुटुंबातून निघून ही तलवार विधीवत पूजन करून बाबांच्या दर्ग्यावर नेली जाते.

दरम्यान, यंदा कोणतेही निर्बंध नसल्यामुळे हिंदू-मुस्लीम भाविकांची प्रचंड गर्दी तलवार मिरवणुकीत पहावयास मिळाली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी तलवारीचे दर्शन घेतले असून यंदा मिरवणुकीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound