चाळीसगाव प्रतिनिधी । किशोर पाटील (ढोमणेकर) यांनी येथील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून आजच्या मुलांना चांगले शिक्षण व सर्व सुविधा मिळाल्या तर ते पुढे जाऊन मोठे अधिकारी होऊन देश व समाजाची सेवा करतील.
किशोरभाऊ पाटिल (ढोमणेकर) यांनी या उपक्रम राबवलामुळे मुलांना मदत मिळाली आहे. असे प्रतिपादन मुख्याद्यापक रविंद्र मोरे यांनी केले. यावेळी उपसरपंच दिपक पाटिल, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम पाटिल व ग्रामपंचायत सदस्य भगवान सोनवणे, सुदाम सोनवणे, प्रभाकर पाटिल, प्रभाकर पाटील, प्रकाश पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकुंदा पाटील व शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते. या सर्वांच्या सहभागाने आणि मदतीने कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न झाला.