चाळीसगाव प्रतिनिधी । येथील रामचंद्र जाधव मित्र मंडळाच्या माध्यमातून आज (दि.25 जुलै) रोजी कु. राजेश्वरी जाधव हिचा 5 वा स्मृतीदिनानिमित्ताने फिजिकल हॅंडीकॅप लायब्ररीचे उद्घाटन व बाल आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात 875 बालकांनी लाभ घेतला आहे.
यावेळी कार्यक्रम योजनेचे चेरअमन डॉ. सुनील राजपूत यांनी फिजिकल हॅन्डीकॅप लायब्ररीचे महत्व सांगत तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगून भाविष्यकाळात एक उत्तम लायब्ररी समाजाला खऱ्या अर्थाने साह्यभूत ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी गेल्या 4 वर्षीच्या उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर प्रदीप देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व खऱ्या अर्थाने समाजातील गरजूंना लाभ होईल, हे पाहून मनस्वी समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर मा.आ. राजीव देशमुख यांनी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत जाधव परीवाराबद्ल गौरव उद्गार काढले, तहसीलदार अमोल गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम कडलग, किसनराव जोर्वेकर, डॉ. संदीप देशमुख आदींनी आपल्या मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी श्रद्धांजलीवर कविता रमेश पोतदार यांनी सादर केली. या शिबिरात 673 बालकानी लाभ घेतला, त्यांना औषधोपचार विनामूल्य देण्यात आलेत, तर आवश्यक त्या बाल रुग्णांवर पुढील उपचार करण्यात येईल व त्यांना बरे केले जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. गिरीश मुंदडा, डॉ. गजेंद्र अहिरराव, डॉ. शैलेंद्रसिंग सूर्यवंशी, डॉ. दिगंबर तेंडुलकर, डॉ. बी.पी.बाविस्कर, डॉ. हरीश राजानी, डॉ.शशिकांत राणा, डॉ.विनोद कोतकर, डॉ. नरेंद्र राजपूत, डॉ. महेश पाटील, डॉ.कल्पेश सोनवणे, डॉ. प्रशांत शिनकर, डॉ.योगेश पोतदार, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ.विनय ठेंग, डॉ. चंदा राजपूत आदी डॉक्टरांनी बालकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रमुख अतिथी मा.आ.राजीव देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडगल, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार अमोल गोरे, पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, किसनराव जोर्वेकर, डॉ. सुनील राजपूत, संदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष मालपुरे यांनी केले तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले आहेत.