भुसावळ (प्रतिनिधी) पुणे येथून एका महिलेचे ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या येथील दोन संशयित आरोपींना आज येथील बाजारपेठ पोलिसांनी पुणे शहरातील बिबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. पावसे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
बिबेवाडी पो. स्टे. त्यांच्याविरुद्ध भाग ५ गुरन १६२/२०१९, भा.दं.वि. कलम- ३९२,३४ प्रमाणे दिनांक ०६-०५-२०१९ रोजी दुपारी २.०० च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी श्रीमती वंदना बाळासाहेब पाटील (रा.पुणे) यांचे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी गळ्यातून ओढून नेले होते. सदर संशयित आरोपी अब्बास ईबादत अली इराणी (वय-१९) रा. भुसावळ व मोहम्मद अली कंबर अली इराणी (वय-२७) रा.भिवंडी मुंबई या दोघांना येथील बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील पापानगर भागातून पकडले असून बिबवेवाडी पुणे पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक देविदास पवार व श्री. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. दत्तात्रय गुलींग, स.फौ. तस्लिम पठाण, पो. ना. नरेंद्र चौधरी, दीपक जाधव, म. पो.ना.आश्विनी जोगी, पो.का.विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, उमाकांत पाटील, संदेश निकम, म.पो.का. ललिता बारी यांनी केली.