चंद्रकांतदादा चर्चा करायला जळगावलाच या ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते देसले यांचे आव्हान (व्हीडीओ)

yogesh desle ncp

जळगाव (प्रतिनिधी) दुष्काळा संदर्भात चर्चा करण्यासाठी जाणते राजे किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांशी भर चौकात चर्चा करायला तयार आहे, असे आव्हान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी चंद्रकांतदादा यांना तुम्ही जळगावचे पालकमंत्री असल्यामुळे तुम्ही बोलवाल त्या जळगावातील चौकात चर्चा करायला यायला तयार असल्याचे प्रतिउत्तर दिले आहे. दरम्यान, ना.पाटील राष्टवादीचे हे आव्हान आता स्वीकारतात का? याचीच आता उत्सुकता लागून आहे.

 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ना. पाटील हे जळगाव जिल्ह्याचे नामधारी पालकमंत्री सुद्धा आहेत. आजपर्यंत त्यांनी जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने किती आढावा बैठका घेतल्या? तसेच दुष्काळ व पाणी टंचाईबाबत काय उपाययोजना केल्या? ते सांगावे. एकीकडे जलसंपदा खाते जिल्ह्यातीलच नेत्याकडे असून ‘अधिकारी आमचे ऐकत नाहीत’ असं ते म्हणतात. तर सोलापूरचे जिल्हाधिकारी आपल्याला माझ्याकडे चहाला सुद्धा येऊ नका असे सांगतात. यावरूनच आपली प्रशासनावर किती पकड आहे हे दिसून येते.

 

 

आपल्याला शरद पवार या नावाचा फोबिया झाल्यासारखे उठसूट मा.पवार साहेबांना आव्हान देण्यापेक्षा राज्यावर असलेल्या दुष्काळाचे आव्हान पेलावे. पवार साहेबांनी दुष्काळासंदर्भात दिलेल्या सूचना अंमलात आणून राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दुष्काळापासून दिलासा द्यावा. ना.चंद्रकात दादा पाटील आपल्याशी पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून चर्चेला मी तयार आहे. फक्त आपण जळगावला यावे. वेळ,दिनांक व चौक देखील आपणच ठरवावा, असे आव्हान पवार साहेबांचा व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आपणास करीत आहे,असलायचे म्हटले आहे. दरम्यान, देसले यांच्या प्रतीउत्तरावर भाजप किंवा चंद्रकातदादा काय उत्तर देतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Add Comment

Protected Content