Home क्राईम चोपडा शहरात चेन स्नॅचिंग; अज्ञात दोन भामट्यांवर गुन्हा दाखल

चोपडा शहरात चेन स्नॅचिंग; अज्ञात दोन भामट्यांवर गुन्हा दाखल


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील यावल रोडवरील एम.जी. कॉलेज समोरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ३२ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी ओढून दुचाकीवरून धूम स्टाईल लांबविण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुवर्ण राजेंद्र सैन्धाने (वय-५२) रा. महालक्ष्मी नगर, यावल रोड, चोपडा या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या यावल रोडने घरी पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवर येऊन उभे राहिले, यातील एकाने महिलेच्या गळ्यातील ३३ ग्रॅम वजनाची सुमारे १  लाख ३२ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी हिस्कावून दुचाकीवरून पसार झाले. महिलेने आरडा ओरड केली तोपर्यंत दोघे दुचाकीने पळ काढलेला होता. दरम्यान महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेबाबत हकीकत सांगितली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुरुवार १३ जुलै रोजी दुपारी १ वाजता २ दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound