भुसावळ प्रतिनिधी । शहरातील गडकरी नगरातल्या महिलेचे मंगळसूत्र चोरी करून पोबारा करणार्या आरोपीस बाजारपेठे पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरन १९४/२०१८ भा द वि कलम-३९२,३४ प्रमाणे दिनांक १३-०७-२०१८ रोजी १६.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी सौ चारुशीला शैलेश बिसे (रा.गडकरी नगर भुसावळ) या दिनांक १३.०७.२०१८ रोजी सकाळी ०७.४५ वाजेच्या सुमारास गडकरी नगर भागातून जात असतांना दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. हे मंगळसूत्र सुमारे ६० हजार किमतीचे होते.
दरम्यान, संबंधीत गुन्ह्यात पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळली की विजय राजू मट्टू (वय-२९ रा पंत नगर मलकापूर) याने गुन्हा केल्याचे समजले. तसेच आरोपी हा मलकापूर रेल्वे स्टेशन चा आवारात आल्याची माहिती वरून त्यास योग्य सापडा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधीत कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, तसेच पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरीक्षक मनोज ठाकरे, पो हे का जयराम खोडपे, पो ना गुलबक्ष तडवी, किशोर महाजन, पो का विकास सातदिवे यांच्या पथकाने केली.