कोलंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यात १० जणांचा मृत्यू झाला असून ८० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबोतील कोच्चीकडे सेंट अँथोनी चर्चमध्ये हे बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बॉम्बस्फोटात 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.दरम्यान, जखमींमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.