यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भालोद गावात देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या पालकांचा माजी आमदार व माजी खासदार कृषी मित्र कै. हरिभाऊ जावळे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच निवृत्त माजी सैनिक यांचा देखील सत्कार फैजपूर विभागाचे प्रांतधिकारी कैलास कडलक ,यावलचे तहसीलदार महेश पवार, फैजपुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, भालोद येथील सरपंच प्रदीप कोळी तसेच माजी आमदार व माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांच्या पत्नी कल्पना जावळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सैनिक प्रदीप दिलीप बडगुजर, अमित एकनाथ कुंभार, हर्षल दिनकर जावळे, धीरज दिनकर जावळे, भूषण विजय महाजन, अमोल विजय महाजन, कैलास संतोष इंगळे, विलास संतोष इंगळे, सचिन श्रावण इंगळे, सचिन दिलीप कोळी, राजेंद्र नरेंद्र बर्डे, दिलीप शामराव भालेराव, नरेंद्र ईश्वर भालेराव, सचिन शालिक भालेराव या सैनिकांच्या माता-पित्यांचा सत्कार शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व साडी देऊन करण्यात आला. तसेच माजी सैनिक संजय रूपचंद भालेराव, सुनील वसंत कुंभार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला, प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी सिमेवर राहुन देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिका बाबत विचार मांडले व त्यांच्या परिवारातील व त्यांची काही ही अडचणी ची दखल अगोदर घेतली जाईल व त्यांचे कामे लवकर मार्गी लावण्यात येतील असे सांगितले ते सीमेवर कर्तव्यदक्ष राहून आपले रक्षण करीत आहे त्यांच्यामुळेच आज आपण या देशात 75 अमृत महोत्सव बिनधास्तपणे पूर्ण भारतात साजरा करू शकत आहोत असे सांगितले या कार्यक्रमाला भालोद च्या गरिमा सेंटर मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून रंगत आणली.
कार्यक्रमाला अमोल जावळे, नारायण चौधरी, मनोज जावळे, अशोक महाजन, संजय डाके, मुरलीधर इंगळे, नारायण कुंभार, जितू कोळी, संजीव भालेराव, सचिन भालेराव, नितीन लहू चौधरी, हेमा इंगळे, मोहन जावळे, अमोल महाजन, प्रवीण परतणे, भास्कर पिंपळे, डी.व्ही, संजीव चौधरी, मनोज चौधरी, शरद जावळे, जाबीर खान, मुकेश चौधरी, शोभा भालेराव, कामिनी जावळे, विद्या चौधरी, दिलीप पाटील, देवेंद्र नेहेते, पोलीस पाटील लक्ष्मण लोखंडे, गिरीश महाजन, अनिल वानखेडे, दीपक महाजन, सुनील कोळीव गावातील असंख्य नागरिक उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच अरुण रामदास चौधरी यांनी केले व आभार हेमलता मुरलीधर इंगळे यांनी मानले.