जळगाव (प्रतिनिधी ) आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी साकेगाव येथील जिल्हा परिषद केंद शाळेला भेट दिली असता त्यांना अजब प्रकार पहावयास मिळाला. विद्यार्थी चक्क फलकावर पाहून उत्तरपत्रिका लिहित होते. यात गंभीर प्रकार म्हणजे या विद्यार्थांना उत्तरपत्रिका वाचण्यासाठी सांगितले तर ते वाचू शकले नाहीत. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन शेरेबुकात सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचे पालन केलेले नसल्याचे आढळून आल्याने भुसावळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना हजेरीपटात विद्यार्थ्याची हजेरी नोंद आढळली नाही. याभेटीत धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यार्थी हे फलकावर पाहून व उत्तरपत्रिका समोर ठेऊन लिहीतांना आढळून आलेत. ज्यावेळी विध्यार्थ्याना उत्तरपत्रिकेत लिहिलेली उत्तर वाचून दाखविण्याचे सांगितले असता त्यांना वाचन करता आले नाही. वर्गात विद्यादार्थाची उपस्थितिती अत्यंत कमी होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मिळते का ? अशी विचारणा केली असता त्यांनी फार कमी विद्यार्थी मध्यान्ह भोजनाचा लाभ घेतात असे सांगितले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी शौचालय असून मात्र ते वापरात नसल्याचे आढळून आले. तसेच शाळेचा आवार, शालेय पोषण आहार स्वयंपाकगृह, गोडाऊन अत्यंत अस्वच्छ होते. साठा नोंदवाहिमधील नोंद अपूर्ण आहेत. यासोबतच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची नोंदीवर स्वाक्षरी नाही. १३ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन शेरेबुकात सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचे पालन केलेले नाही. त्यानंतर सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतर देखील या शाळेला गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख यांनी भेट दिल्याचे आढळले नसल्याने भुसावळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एम. एन. धीमते यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पंचायत समिती भुसावळ
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी पंचायत समिती भुसावळ येथे भेट दिली असता त्यांना तीन कर्मचारी गैरहजर आढळून आले. यात यु. एम. पाटणकर, संजय तितुरकर, राजू भिकन मिस्त्री यांची हजेरीपटावर स्वाक्षरी नव्हती. तसेच हालचाल नोंद वहीत कोणतीही फिरस्तीची नोंद न करता कार्यालयात अनुपस्थित आढळून आले. थोड्या वेळाने विस्तार अधिकारी (ग्रा.पं. ) यु. एम. पाटणकर कार्यालयात हजर झाले. तिघांना शिस्तभंगाची नोटीस बजावून करणे दाखवा नोटीस देण्यात आली.
भुसावळ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी भुसावळ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट दिली असता एनआरएचएम कक्षातील लेखापाल वैशाली वाणी, बीसीएम श्रीमती आर. जी. सोनावणे, बीएनडी ज्योती जगताप त्यांना तीघ कर्मचारी गैरहजर आढळून आले असून हालचाल नोंद वहीत कोणतीही फिरस्तीची नोंद न करता कार्यालयात अनुपस्थित आढळून आल्याने तिघांना करणे दाखवा नोटीस बजविण्यात आली.
जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्हा परिषद मधील महिला व बालकल्याण विभागास अचानक भेट दिली असता त्यांना अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळून आले. यात कक्ष अधिकारी सरवर तडवी, कार्यालयीन अधिकक्षक बी. आर. पाटील, कनिष्ठ सहाय्यक विजय ठाकरे, प्रशांत सोनवणे, परिचर गुलाम मो. गुलाम कादिर शेख खाटिक गैरहजर होते. यात कार्यालयीन अधिकक्षक बी. आर. पाटील अर्जित रजेचा अर्ज मंजूर नसताना रजेवर गेलेले आढळून आल्याने त्यांची दोन दिवस विनावेतन करण्यात आली आहे. तर उर्वरितांची एका दिवसाची करण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागातील परिचर अमजद खान असलम खान, अमळनेर पं. स. परिचर सोनू दगा पाटील व ग्रामसेवक दिनेश कृष्णा देवराज गप्पा मारताना आढळून आल्याने तिघांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले.