चीनी एसीच्या आयातीवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली । केंद्र सरकारने चीनहून आयात करण्यात येणार्‍या एयर कंडिशनरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून यामुळे चीनी कंपन्यांना पुन्हा एकदा मोठा दणका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, रेफ्रिजरेट्ससह वातानुकूलन आयातीबाबतच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. याअंतर्गत, ते मुक्त श्रेणीतून काढून टाकले आहे आणि प्रतिबंधात्मक यादीमध्ये ठेवले आहे. यासह, ते टायर, टीव्ही सेट आणि अगरबत्ती या उत्पादनांच्या यादीत सामील झाले आहेत. ज्यांना आयातीवर बंदी आहे.

देशांतर्गत एयर कंडिशनरची बाजारपेठ ही खूप मोठी असून यात अलीकडच्या काळात चीनमधून आयात ही प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. यामुळे देशातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चीनी एसीवर बंदी लादण्यात आल्याचे मानले जात आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून ही बंदी लादण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, याचा चीनी कंपन्यांना फटका बसणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Protected Content