काश्मीरबाबत केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती

Home Minister Kishan Reddy

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील सद्य परिस्थितीबद्दल केंद्र सरकारने आज लोकसभेत माहिती दिली. गृह राज्यमंत्री किशन रेड्डी म्हणाले की, कलम ३७० हटविल्यापासून ८४ वेळा सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. १९९० पासून ते १ डिसेंबर २०१९ या काळात तब्बल २२ हजार ५५७ दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा झाला आहे.

रेड्डी यांनी सांगितले की, याशिवाय २००५ पासून ते ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या १ हजार ०११ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, ४२ दहशवतादी पकडले गेले तर २ हजार २५३ दहशतवाद्यांना जवानांकडून पिटाळून लावण्यात आले आहे. तसेच, ऑगस्ट महिन्यात ५९ वेळा दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे सामान्य असल्याचे सांगितले.

Protected Content