नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने इंदूर आणि मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित केले आहेत. यासाठी १८ हजार ३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता सुधारेल असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या व्हिजनच्या अनुषंगाने असून या प्रकल्पामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील असा दावाही करण्यात आला आहे. मुंबई आणि इंदूरसारख्या व्यावसायिक शहरांना या रेल्वे प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
पंतप्रधान गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान अंतर्गत हा प्रकल्प मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी उभारण्यात आला आहे. प्रवासी, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये दोन राज्यातील सहा जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेश चार जिल्हे या मार्गामुळे जोडले जाणार आहे. तसंच, या मार्गामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे नेटवर्क ३०९ किमीने वाढणार आहे. २०२८-२०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ३० नवी स्थानके बांधण्यात येणार असून या प्रकल्पामुळे १००० गावे आणि ३० लाख लोकांना फायदा होणार आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशसह देशाच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम भागामध्ये पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन-इंदूर विभागातील विविध पर्यटन धार्मिक स्थळांकडे पर्यटकांची संख्य वाढेल