जळगाव, प्रतिनिधी | प. पू. दलाई लामा यांना १९८९ साली १० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिनाच्या दिवशी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचे औचित्य साधून आज जळगाव येथे जी. एस. ग्राउंडवर आलेले तिबीटीयन बांधवानी पारंपारिक पद्धतीने आपला आनंद साजरा केला.
जी. एस. ग्राउंड येथे मागील तीस वर्षापासून तिबेटीयन बांधव स्वेटर्स विक्री करण्यासाठी येत असतात. आज त्यांनी विश्वशांतीसाठी व बौध्द धर्मगुरू प. पू. दलाई लामा यांना शांती पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने पारंपारिक पद्धतीने पूजा केली. आज त्यांनी आकर्षक वेशभूषा केली होती. तिबेटीयन गीत व नृत्य करत विश्वशांतीसाठी धूप व अगरबत्ती जाळून पूजा करण्यात आली. यानंतर तांदळापासून बनविलेले ‘सादू’ चे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी यावेळी प्रार्थान करण्यात आली. तिबेट जर स्वातंत्र्य झाला तर भारतला सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.