पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे सावित्रीबाई फुले वाचनालयातर्फे महात्मा ज्योतिबा फुले पतसंस्थेच्या सभागृहात वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री आनंदा रामा काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मधुकर पांढरे सर उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
वाचणालयाचे उपाध्यक्ष श्री गावंडे सर, रमेश बनकर व मधुकर पांढरे सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष विवेक जाधव यांनी तर आभार सुजाता पणसकर यांनी मानले. यावेळी ज्ञानेश्वर करवंदे ,अशोक घोंगडे, सुभाष सूर्यवंशी, हरिश्चंद्र जाधव, सुरेश चौधरी, वैशाली सपकाळे, कल्पना चौधरी, भास्कर कल्याणकर, रुपेश प्रजापत, प्रकाश शिंगोटे यांच्यासह वाचनालयातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.