Home Cities जळगाव गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याला उजाळा देत सुंदर अशी भाषणे सादर केली. इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी अनुश्री चौधरी हिने उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे… हे सुंदर गीत सादर केले तर कार्यक्रमाची सांगता उपशिक्षक योगेश भालेराव यांनी चांदण्याची छाया कापराची काया……या गीताने केली. प्रसंगी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound