जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ.विजय गायकवाड, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. सतीश सुरळकर, दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, नरेंद्र वाघ, जे. एस. गवळी, ज्ञानेश्वर डहाके, ज्ञानेश्वर राठोड, गोपाळ बहुरे, बाळासाहेब गुंडाळे, राजेंद्र वैद्य, दिपाली पाटील,वैशाली रोडे, बी. सी. शिंदे, करण गावित, उमेश टेकाळे, संजय शेळके, देविदास गायकवाड, शितल राजपूत, दगडू भारसके आदी उपस्थित होते.