भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने १ जून १९४८ रोजी पहिली बस सेवा सुरू केली होती. आज या बसला ७१ वर्षे पूर्ण झाली असून संपूर्ण राज्यात हा वर्धापन दिवस प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटप करून साजरा करण्यात आला.
आधी जी बस सुरु करण्यात आली होती, ती बस लाकडाची होती. चारही बाजूनी लाकडाची व वरील बाजू कापडाची अशी होती. या बसला प्रवाशांकडून चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर बसमध्ये कालानुरूप बदल करण्यात आले. शासनाकडून अनेक सुविधा प्रवाशांना मिळत गेल्या त्यामुळे प्रवाशांचा बसकडे ओढा वाढला. आज रोजी भुसावळ आगारात ११०० बसेस असून प्रवाशांना चांगल्या प्रकारे सुविधा पुरवीत आहेत. शहरात, गावात, खेड्या पाड्यात, दुर्गम भागात ज्या ठिकाणी कुठलेही वाहन पोहचत नाही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आज रोजी पोहचत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी बसचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करण्याचे आवाहन आगर प्रमुख यांनी प्रवाशांना केले आहे.या प्रसंगी प्रमुख पाहुणे महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे, आगार प्रमुख भोई, डेपो मॅनेजर, उपस्थित होते.