अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी ग्रंथालय व मोफतवाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर,संचालक जाधव सर,दिपक वाल्हे हे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले. तर प्रतिमापूजन व व माल्यार्पण विश्वस्त बापू नगांवकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्याबद्दल सानेगुरूजी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक जाधव सर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाचे राजे होते. ते बहुजन समाजाचे राजे होते. त्यामुळे महाराजांच्या कार्याचा वसा घरोघरी पोहचला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक वाल्हे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी वाचनालयाचे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी कार्यक्रमाला वाचनप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.