कासोदा (प्रतिनिधी) येथील ब्ल्यु टायगर ग्रुपतर्फे गौतम बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अडकमोल गुरुजींनी सपत्नीक भगवान बुध्दांच्या प्रतिमेस माल्यार्पण केल्यानंतर कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी भगवान बुद्धांविषयी माहिती सांगितली. वानखेडेगुरुजी यांनी विशेष सहकार्य केले, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी करण सोनवणे, अक्षय पानपाटील, राहुल पानपाटील, विलास बनसोडे, जितु वाघ, अजय बोदडे, कैलास ठाकरे, दिपक शिंपी, आकाश पानपाटील, कल्पेश मोरे, सतिश सोनवणे यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.