Home Cities चोपडा चोपडा येथे जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा

चोपडा येथे जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा


चोपडा प्रतिनिधी । ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तसेच शासकीय नियमांचे पालन करून थोडक्यात जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला.

सकाळी हरेश्वर मंदिर येथे कॅमेरा पूजन व कोरोना योद्धा सन्मानपत्र वितरण आणि फोटोग्राफर सदस्यांच्या गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान व वृक्षारोपण करून जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला.

फोटोग्राफर सदस्यांच्या परिवारातील जे सदस्य वैद्यकीय क्षेत्रात, शासकीय व प्रशासकीय क्षेत्रात सेवा देणारे, तसेच कोरोना काळात अन्नदान करणारे सामाजिक कार्यकर्ते त्या व्यक्तींचा तसेच फोटोग्राफर सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान पत्र पुष्पगुच्छ देऊन असोसिएशनचे तालुकाप्रमुख ,ज्ञानेश्वर सैंदाणे, शहर प्रमुख विलास कोष्टी, ग्रामीण प्रमुख नरेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत चौधरी व सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हरेश्वर मंदिर परिसरात असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य ए पी पाटील, संजय पाटील, राजेंद्र धनगर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन ए पी पाटील यांनी व आभार प्रदर्शन प्रशांत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर सैंदाणे, सुरेश चौधरी, विनोद जाधव, विलास, योगेश, शफिकभाई खोकर, वसीम तेली यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound