धरणगाव, प्रतिनिधी | येथील के. जी. गुजराथी मूकबधिर निवासी विद्यालयात जागतिक( अपंग) दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. ३ डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जवाहर प्रसारक मंडळ संचलित के.जी. गुजराथी निवासी मूकबधिर विद्यालयात जागतिक( अपंग) दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी धरणगाव पोलीस स्टेशन निरीक्षक पंकज देसले हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील तसेच वसंत नवल पाटील, पंचायत समिती दिव्यांग विभागाचे दीपक पाटील, ग्रामीण रुग्णालयातील डॉ. कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालक मेळावा देखील घेण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आर.एच.पाटील यांनी तर आभार संतोष भडांगे यांनी मानले. शाळेतील कर्मचारी वर्ग व मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, नंदू पाटील, चंदू पाटील, किशोर पाटील, बापू जाधव इत्यादीनी यशस्वितेसाठी कामकाज पाहिले.