चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाच्या नियमित जलतरणप्रेमी सदस्यांनी आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी योग शिबिर घेऊन हा दिवस साजरा केला.
स्विमिंग क्लब अध्यक्ष दिलीप घोरपडे, सचिव अर्जुन परदेशी व कार्यकारिणी सदस्यांच्या आवाहनानुसार आजचा हा योग शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी योगशिक्षक मधुकर कासार यांनी सर्व सदस्यांकडून अत्यंत सुंदर पद्धतीने योगा हा व्यायाम प्रकार करून घेतला. सर्व जलतरणपटू सदस्यांना यामुळे सुंदर अनुभूती आल्याने यापुढे येथे नियमित योगा करण्याचे सर्वांनी ठरवले.