Home Cities अमळनेर अमळनेर येथे वृक्षवल्ली परिवारातर्फे महिलांचे पर्यावरणपूर्वक धुलीवंदन साजरे

अमळनेर येथे वृक्षवल्ली परिवारातर्फे महिलांचे पर्यावरणपूर्वक धुलीवंदन साजरे


 

26e310fd 8bb9 4779 ba84 6ee857939dce
e

 

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील वृक्षवल्ली परिवारातर्फे महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेले इको फ्रेंडली पर्यावरणपूर्वक धुलीवंदन साजरे करण्यात आले. यावेळी कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंग वापरण्यात आले. तसेच शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने धुलीवंदन खेळताना पाण्याचा टाळण्यात आला.

 

येथील वृक्षवल्ली परिवार नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतो.या परिवारातर्फे आजपर्यंत पर्यावरण संरक्षण, महिला हळदीकुंकू, पर्यावरण पूर्वक धुळवड, वृक्ष लागवड असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. आजही धुलीवंदन अत्यंत उत्साहाने साजरे करण्यात आले. यावेळी वृक्षवल्ली परिवाराच्या अध्यक्ष नीलिमा सोनकुसरे, अपेक्षा पवार, शीतल सावंत, प्रा.जयश्री साळुंके, सुरय्या शेख, योगिता पांडे, माधुरी पाटील, विद्या हजारे, राजश्री पाटील, अर्चना आठवले, राधा नेटले, निशा दुसाने, नेहा देशपांडे, उज्वला पाटील, रुपाली शिरोडे, शकुंतला वाणी, चैताली वैद्य आदी सदस्या उपस्थित होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound