आगामी गणेश उत्सव शांततेत साजरे करा – पोलिस अधिक्षक डॉ. रेड्डी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी गणेश उत्सव काळात रावेर शहरातील ट्रॉफीक समस्या पोलिस सोडवणार असून, खड्डे पालिका बुजवणार आहे. विज पुरवठा सुरळीत मिळण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे, गणेश मिरवणूक शांततेत पार पाडायची आहे. मिरवणुकीत डीजे न वापरता कोणी उपद्रवी शांतता भंग करत असल्यास त्यांच्या नावांची माहिती पोलिस प्रशासनाला देण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये जातीय सलोखा व सामाजिक एकोपा कायम ठेवण्यासाठी शांतता समितीची सभा संपन्न झाली. यावेळी पोलिस अधिक्षक श्री. रेड्डी बोलत होते. फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनीही आपले विचार मांडत गणेश उत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले.

यावेळी रावेर मुख्याधिकारी स्वालिया मालेगावे, महावितरण अधिकारी श्री. मराठे, नायब तहसीलदार आर. के. पाटील, निंभोरा सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे, पंचायत समिती रावेर श्री. फेगडे, डॉ. एस. आर. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष महेमूद शेख, डॉ. सुरेश पाटील, अशोक शिंदे, पद्माकर महाजन, डी. डी. वाणी, सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष संतोष पाटील, गयास शेख, सुरेश पाटील, दिलीप कांबळे, माजी बाजार समिती सभापती निळकंठ चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, गणेश मंडळ अध्यक्ष, पोलिस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाटील उपस्थित होते.

रावेर पालिकेतील रस्त्यांवरील खड्डे आणि वाढते अतिक्रमण यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या कारणामुळे गणपती मिरवणूक कशी काढायची, असा प्रश्न विविध गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी शांतता कमेटीच्या बैठकीत मांडला. या समस्या लवकरच सोडवल्या जाणार असल्याचे आश्वासन मुख्यधिकारी मालगावे यांनी दिले.

Protected Content