जळगाव, प्रतिनिधी | शहरात सालाबादप्रमाणे यावर्षीही वासुदेव जोशी गोंधळी समाज व तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने आज (दि.१३) कढाया (चक्रपूजा) हा सण साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन देवीला सांजोरीचा नैवेद्य देऊन पुजा केली. सर्व भक्तांनी वाजत-गाजत देवीचा झेंडा घेऊन मिरवणूक काढली. त्या दरम्यान गावातील फिरस्ती माता मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, मरीमाता मंदिर, महादेव मंदिर येथेही नैवेद्य ठेवला. त्या नंतर मिरवणूक पुन्हा नियोजीत ठिकाणी म्हणजे श्री गुरू गोरक्षनाथ मंदिरात येऊन देवीचा झेंडा साती आसरा माता मंदिरात लावण्यात आला. त्यानंतर सगळे समाज बांधव दर्शन घेऊन आपापल्या घराकडे रवाना झाले.