जळगाव,प्रतिनिधी | येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली. तसेच भाषण देखील दिलेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव मुकेश नाईक होते.
विद्यालयात प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी केले. इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थीनिनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा केल्या होत्या. तसेच इयत्ता पहिलीचा मनिष सुरळकर याने विवेकानंद यांची वेशभूषा केली. भूमिका पाटील, यशस्वी पाटील, जयेश पाटील, लावण्या अत्तरदे, मेघना पगारे, तेजस्विनी दांडगे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी भाषणांमधून माहिती दिली. शिक्षिका जया पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याविषयी महती सांगणारी कविता सादर केली. सूत्रसंचालन सहावी इयत्तेची विद्यार्थीनी भाग्यश्री मिस्त्री हिने केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेश नाईक यांनी, राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची पूजा करून त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी ठेवावा असे सांगत महापुरुषांच्या विचारांना आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन रोहिणी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, उज्जवला नन्नवरे, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, साधना शिरसाठ, मोनाली सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.