गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शिक्षकदिन साजरा

good

धरणगाव प्रतिनिधी । येथील गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पअर्पण करून करण्यात आली. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी पुष्पहार अर्पण केला. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घरापर्यंत पोहचविणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी तर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शिक्षिका नाजनिन शेख यांनी माल्यार्पण केले. तसेच शाळेतील शिक्षकांना गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला.

इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनींनी गुरुवंदना सादर केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जबाबदार मतदार याविषयीची माहिती व प्रतिज्ञा देण्यात आली. शिक्षक दिन का साजरा केला जातो? शिक्षक दिनाचे महत्व काय ? याविषयी सुरवातीलाच माहिती देण्यात आली. आजच्या दिवशी ज्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली. हेड बॉय कौस्तुभ महाजन व हेड गर्ल अंजली कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्राजक्ता बाविस्कर या विद्यार्थिनीने शिक्षकांची महती एका अतिशय सुंदर गीतातून व्यक्त केली. तसेच मनस्वी पाटील, पूर्वा जाला, मनस्वी पवार, अंजली बडगुजर, कुणाल चव्हाण, रोहन पवार, जुएब शेख या विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांबद्दल असलेला आदर मनोगताद्वारे व्यक्त केला. कार्यक्रमात विदयार्थी-विद्यार्थिंनी व पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या, शाखा व्यवस्थापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपना पाटील व आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी केले.

Protected Content