Home Cities भुसावळ बियाणी स्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा (व्हिडीओ)

बियाणी स्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा (व्हिडीओ)

0
109

BIYANI SCHOOL

भुसावळ, प्रतिनिधी | येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये आज (दि.४) शिक्षकदिन साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे उपस्थित होत्या.

 

यावेळी बियाणी गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, स्मिता बियाणी, संजय लाहोटी, सु.ग.टेमानीचे प्रिन्सिपल मनोज माहेश्वरी, प्रवीण भराडीया, राजू पारीख, डॉ. संगीता चांडक, राधा झंवर, दीपक धांडे, गोपाळ ठाकूर, प्रिंसीपल डी.एम.पाटील, भारती राठी, किरण पारीख, रितिका हेडा आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बियाणी गृपतर्फे सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. पर्यवेक्षक भारती राठी, रितिका हेडा होत्या. सूत्रसंचालन प्रतीक तिकोटे व संगीता नायक यांनी तर आभार प्रदर्शन प्रिंसीपल डी.एम.पाटील यांनी केले.

 

 


Protected Content

Play sound