जामनेर, प्रतिनिधी | येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाचे प्रथम शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने राष्ट्रीय शिक्षणदिन साजरा करण्यात आला.
त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांच्या हस्ते मौलाना कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.