Home Uncategorized विवेकानंद विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहात साजरा

विवेकानंद विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहात साजरा


chopda
 

चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयात आज १ मे “महाराष्ट्र दिन” व “कामगार दिवस” मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

 

 

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना दंडगव्हाळ, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका जेनिफर मथायस, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती सोनार उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने व परिपाठने करण्यात आली. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना दंडगव्हाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाचे उपशिक्षक प्रसाद वैद्य यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची माहिती साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितली. इंग्रजी विभागाच्या उपशिक्षिका अश्विनी महाजन यांनी महाराष्ट्रगीत सादर केलं. उपशिक्षक अभिषेक शुक्ल यांनी विद्यार्थ्यांकडून घोषणा म्हणून घेतल्या,कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार उपशिक्षक हेमराज पाटील यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागाचे शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound