एरंडोल (प्रतिनिधी) येथे आज (२१ जून) डी.डी.एस.पी. महाविद्यालयात सकाळी ७ ते ८.३० यादरम्यान योगा दिनानिमित्ताने योगा अभ्यास घेण्यात आला. तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, पंचायत समितीचा शिक्षण विभाग, पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित योग समिती व डी.डी.एस.पी. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ईश्वर पाटील कृष्णा पाटील व अशोक चौधरी यांनी योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व योगाचे महत्त्व पटवून दिले. गट विकास अधिकारी अंजुश्री गायकवाड, प्राचार्य डॉ.ए.आर. पाटील, नायब तहसीलदार एस.पी. शिरसाट, गटशिक्षणाधिकारी एन.एफ. चौधरी, शालेय पोषण आहार अधीक्षक व्ही.एच. पाटील, उपप्राचार्य सुरेश पाटील, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.बी. पाटील, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. मनोज पाटील, शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक ‘मैत्री संग फाउंडेशन’चे कार्यकर्ते, शिक्षक यांच्यासह शहरातील सुमारे तीन हजार विद्यार्थी व योग प्रेमी नागरिक उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यात १४७ शिक्षक आणि २६ हजार ७७६ विद्यार्थी यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.