यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील टपाल कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी टपाल पोस्ट मास्तर आरीफ तडवी यांच्याहस्ते कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर आरीफ तडवी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता भावसार या उपस्थित होत्या. यावेळी शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या समाजातील कर्तुत्ववान महिलांसह अल्पबचत योजना महिला प्रतिनिधींचाही याप्रसंगी गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. टपाल कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी आरीफ तडवी यांनी उपस्थित महिलांना अल्पबचत योजनांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी सुनिता भावसार, लता बेहेडे, अश्विनी यावलकर- कवडीवाले, मंजूषा कवडीवाले यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी टी. एस. तडवी, धनश्री बिनेकर, हितेंद्र पाटील, श्री. ठोके, बेबाताई श्रीखंडे, भास्कर सुर्यवंशी यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन सावळे यांनी केले. तर उस्थितांचे आभार लिलाधर अहेर यांनी मानले.