जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुन भागात आज (दि.30) बैलपोळा सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सर्व शेतकरी बांधवानी यावर्षी सुध्दा मेहरुन परिसराच्या बाहेर नारळाचे तोरण बांधले होते. हे तोरण फोडण्यासाठी बैलांची शर्यत लावण्यात येत असते. ज्या शेतकरी बांधवाच्या बैलाने हे तोरण फोडले त्या बैलाला भेट म्हणून साज देण्यात येतो. ही शर्यत पाहण्यासाठी प्रचंड नागरिकांची गर्दी होत असते. यावेळी सर्वांचे लक्ष या शर्यतील बैलाकडे लागलेले असते. कोणाचा बैल हे तोरण फोडणार आहे.