सीबीएसई बारावीचा निकाल लागला

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) च्या इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. यावर्षी ८७.९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर गेल्या वर्षी ही टक्केवारी ८७.३३ होती. म्हणजेच यंदाच्या निकालात ०.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांच्या तुलनेते मुलींचा निकाल अधिक चांगला लागला आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचा निकाल ९१.५२ % लागला आहे तर मुलांचा निकाल ८५.१२ % लागला आहे.
सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा ७१२६ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचा निकाल सीबीएसईच्या cbse.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. तेथे जाऊन तुम्ही निकाल चेक करू शकता.

Protected Content