सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दुषीत पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची घटना घडली आहे. यामुळे गावातील २० ते ३० जणांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यासाठी निंभोरा येथील आरोग्य अधिकारी डॉ. चंदन पाटील व त्यांची वैद्यकीय विभागाची टिम रूग्णाच्या सेवेत दाखल झाले आहे.
वाघोदा गावातील गणेश नगर, आंबेडकर नगर, मोठा वाडा, बेघर वस्ती रमाई नगर या भागातील या रुग्णांना गॅस्ट्रोची लक्षणे दिसल्याने व रुग्ण वाढल्याने हा प्रकार निदर्शनास आला आहेत. त्यामुळे यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी खळबळून जागे झाले असले तरी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू असा कुठलाही प्रकार वाघोदा गावात नसल्याचे स्पष्ट इन्कार केला आहे.
दूषित पाण्यामुळे किंवा ऊन लागल्यामुळे रुग्णांना ही लक्षणे जाणवत असल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज खाजगी डॉक्टरांकडून वर्तवला गेला. मात्र हा सर्व प्रत्येक भागातुन रूग्ण आढळल्याने दुपारी 3 वा प्राथमीक आरोग्य डॉक्टर व अधिकारी यांचा ताफा हजर झाला. त्यांनी सर्व आरोग्य सेवक व ग्रामपंचायतकडुन संपुर्ण माहीती घेतली व गावात पाणी तपासणीच्या सुचना दिल्या. तेव्हापासुन आरोग्य केंद्रात गावातील गॅस्ट्रोस्रदृश्य आजाराच्या रुग्णांची माहिती गोळा करणे चालू असून पाण्याची ओटीए तपासणी देखील चालू करण्यात आली आहे
वाघोदा गावात सोय व औषधी उपलब्ध नसल्याचे काही रुग्णांना निंभोरा रुग्णालयात पाठवण्यात आले. वाघोदा आरोग्य केंद्रात जागा नसल्याचे रुग्णांसाठी मंडप गादीची तात्काल व्यवस्था करण्यात आली. कुणालाही गॅस्ट्रो सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित वाघोदा येथील उपआरोग्य, आयव्हीं व औषधोपचार उपलब्ध असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.
यावेळी वाघोदा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ धापटे.जिल्हा साथरोग अधिकारी डॉ बाळासाहेब वाभळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजय रिंढे, डॉ सचिन ठाकुर लोहारा, डॉ निरज पाटील चिनावल, आरोग्य विस्तार अधिकारी अब्दुल दस्तगीर, तालुका आरोग्य सहाय्यक राजेश खैरनार यांनी भेट दिल्या व सर्व माहीती घेऊन सुचना दिल्या.
शेजारच्या प्रा.आ.केंद्र ऐनपुर येथील कर्मचारी आरोग्य सहाय्यक एम.ए.पवार, आरोग्य निरीक्षक सी.व्ही.पाटिल, आरोग्य सेवक चंद्रकांत चौधरी, कैलास महाजन, डि.के. नमायते, खुशाल सुरजागडे, कैलास सरोदे, सुभाष ठाकुर, जीवन सोनवणे, शुभम महाजन, तुषार महाजन, प्रशांत नरवाडे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग हे सहकार्य साठी उपस्थित झाले होते. आ. चंद्रकांत पाटील, रावेर गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायकळ यांचेसह निंभोरा,चिनावल, ऐनपुरसह तालुक्यातील पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी प.स.आरोग्य विस्तार अधिकारीसह कर्मचारी यांनी पाहणी केली.