सावधान : कोरोना रूग्ण संख्या वाढतेय; आज जिल्ह्यात ९ रूग्ण !

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून कमी असलेली कोरोनाची रुग्ण संख्या अचानक वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यामध्ये ९ रुग्ण आढळून आल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे.

 

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यातून ९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात-३, मुक्ताईनगर-३, भुसावळात-२ आणि पाचोर १ असे एकुण ९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आता जिल्ह्यात १८ अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४२  हजार ८२६ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरीयंटची सर्वत्र धास्ती असल्यामुळे अलर्ट दिला गेलेला आहे. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अलीकडेच नवी नियमावली जारी केली होती. तर आज संध्याकाळीच नववर्ष आणि अन्य कार्यक्रमांसाठीची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये नववर्षाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी सुद्धा नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content