हिंगोणा येथे वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला; महसूल विभागाची कारवाई

फैजपूर ता. यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे डंपर महसूल व पोलीस विभागाने पकडले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर ते यावल रोडवरील हिंगोण गावाच्या जवळी असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवार १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री यावल तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी आणि यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे गस्तीवर असतांना बेकायदेशीर बेकायदेशीर वाळूची वाहतूक करतांना डंपर क्रमांक (एमएच ४० एके ३८६७) मध्ये पथकाने पकडले. वाळू वाहतूकीची परवाना बाबत विचारले असता डंपर चालक बाळू दिनकर सोळंखे रा. कोळन्हावी ता. यावल याने उडवा उडवीची उत्तरे दिली. यावल पोलीसांनी डंपर चालकाला अटक केली असता डंपर ताब्यात घेतले आहे. तर डंपर चालकाचे साथीदार ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव कोळी रा. कोळन्हावी, मनोज दिनकर राणे रा. यावल, जयेश भावसार कुळकर्णी रा. शिवकॉलनी यावल आणि चाकोर चौधरी रा. फैजपूर ता. यावल हे महसूल आणि पोलीस पथकाच्या गाड्यांवर नजर ठेवत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मंगळवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल सुमित चालकासह इतर पाच जणांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देवीदास सुरदास करीत आहे.

 

Protected Content