सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) । रेशनचा तांदुळ काळाबाजारात विक्री करणाऱ्या ट्रकला सावदा पोलीसांनी जप्त केला असून सुमारे चार लाख रूपये किंमतीचा तांदूळ हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाघोदा गावाच्या शिवारात प्रगती टोलनाक्या समोरील मोकळ्या जागेत मालवाहू ट्रक (एमएच १९ झेड १२७४) हा संशयास्पद रित्या उभा होता या संदर्भात सावदा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस आर गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील संजीव चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुरकुरे पोलीस नाईक मेहरबान तडवी या पथकाने मंगळवारी 28 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास वाघोदा गावाजवळील प्रगती टोल नाक्या समोर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये शासकीय मालकीचा शहाण्णव क्विंटल तांदूळ आढळून आला पोलीस पथकाने कारवाई करत असल्याचे पाहताच अज्ञात ट्रक ट्रक सोडून शेतात पसार झाला आहे सावदा पोलिसांनी ट्रक जप्त करून सावता पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस नाईक मेहरबान तडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे