एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील विखरण येथे एकाच्या घरातून ३० हजार ४०० रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संजूबाई वना सुर्यवंशी (वय-५६) रा. विखरण ता. एरंडोल जि.जळगाव ह्या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात कुणीही नसतांना घरातून ३० हजार ४०० रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रवी पाटील करीत आहे.